अमरावती :
शिक्षण महर्षी व कृषी महश्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्राप्त व्हावी यासाठी सर्व स्तरातून व्यापक प्रयत्न होत आहेत .आणि त्या सर्व प्रयत्नांना भरघोस यश प्राप्त होत आहे. या कामी दिल्ली मुंबई अहमदाबाद मेरठ नागपूर व अमरावती येथील विविध सामाजिक व राजकीय व्यक्ती तसेच संस्था कामाला लागल्या असून त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत आहे . अमरावतीचे राज्यसभा सदस्य खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राज्यसभेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा हा प्रस्ताव मांडला .तसेच त्यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष पत्र देऊन आपल्या मागणीला दुजोरा दिला. तसेच दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे सीनियर एड. कमलाकांत चौधरी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शहा यांना अखिल भारतीय कुर्मी महासभेतर्फे निवेदन देऊन भारतरत्नची मागणी केली. त्याचप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य देखील कार्यरत असून या कामाला वेग येण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. भारत सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देऊन गौरव करावा अशी मागणी संस्थेने यापूर्वीच एका ठरावाद्वारे शासनाकडे केली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष एड पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक तातडीची सभा अमरावतीला घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रवी राणा तसेच माजी खासदार सौ.नवनीत राणा यांनी देखील या कामी पुढाकार घेतला असून त्यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासन दरबारी हा प्रश्न उपस्थित केला आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न महत्त्वाचा असून राज्य शासनाचा तसा प्रस्ताव करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्याचे मान्य केले आहे.तसेच अमरावतीचे सामाजिक कार्यकर्ते व अमरावती जिल्ह्याचे मनसेचे श्री पप्पू पाटील व ॲनिमेशन कॉलेजचे श्री विजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सर्व पार्श्वभूमी समजून सांगितली .ही पार्श्वभूमी ऐकल्यानंतर श्री राज ठाकरे यांनी ताबडतोब श्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे याची लेखी मागणी केली. त्याचप्रमाणे अमरावती लोकसभेचे माजी संसद सदस्य श्री आनंदराव अडसूळ व दर्यापूर विधानसभेचे माजी आमदार श्री अभिजीत अडसूळ यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भारतरत्न हा प्रश्न शासनाकडे दाखल करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून त्या दृष्टिकोनातून ते पावले उचलणार आहेत. केरळ व बिहार प्रांताचे राज्यपाल श्री रा सु गवई यांच्या पत्नी लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ कमलताई गवई यांनी देखील डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावे यासाठी पाठपुरावा चालविला आहे.तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री दिनेश सूर्यवंशी हे महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भारतरत्न प्रस्तावाचे अनुमोदन करण्याची विनंती करणार आहेत..त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांची माजी कुलगुरू श्री प्रकाश घवघवे तसेच त्यांचे सहकारी यांनी भेट घेऊन भारतरत्न पुरस्कारासाठी आग्रह धरला आहे .या सर्व मोहिमेचे केंद्रीय सूत्रधार व डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीचे व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व राज्य समन्वयक प्राचार्य डॉ. व्ही. टी.इंगोले यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी द्यावी हे निवेदन दिले आहे .तसेच प्रा. काठोळे यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांची पुतणी श्रीमती रजनीताई देशमुख यांनी आपला सहभाग स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला असून भारतरत्न मिळवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.श्री संत अच्युत महाराज यांचे पट्ट शिष्य श्री संत सचिन देव महाराज यांनी देखील स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावतीला झालेल्या पुण्यस्मरण कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावे देण्यात यावे अशी जाहीर सभेत मागणी केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी संस्थात्मक तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. ही जमेची बाजू आहे .सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षभेद विसरून ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडण्याचे ठरवल्यामुळे 125 व्या जयंतीनिमित्त पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर होईल असा आशावाद सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी
अमरावती
9890967003