*” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र* —–
*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई*
*पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत* …….
*अध्यक्षपदी श्वेता कोरगावकर व सदस्यपदी प्रसंन्ना देसाई व एकनाथ नाडकर्णी यांची निवड* .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली . या समितीच्या अध्यक्ष , सदस्य , सदस्य सचिव यांची बैठक सिंधुदुर्गनगरी ओरस येथील जिल्हाधिकारी दालन येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रांताधिकारी व महीला बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
या बैठकीत आतापर्यंत प्राप्त लाभार्थी यादीस मंजुरी देण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १,३५,५२७ लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली . यात सावंतवाडी तालुक्यातील २१,२२८ , दोडामार्ग तालुक्यातील ६४०६ व वेंगुर्ले तालुक्यातील १५,३०७ पात्र लाभार्थी मंजूर करण्यात आले .
” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ” ही योजना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली . भाजपा लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंचांनी शासनाला सहकार्य करत या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहभाग घेतला . त्यामुळेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ४२,९४१ भगिनींना रक्षाबंधना दिवशी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांची ३००० रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे .
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*