कुडाळ :
कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे भजन महोत्सव तसेच श्रद्धांजली कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या उपस्थित संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा भजनरत्न श्री.भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड.यशवर्धन राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथून श्री.संत आनंद महाराज आसूर्ले पन्हाळा कोल्हापूर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमातील भाषणात सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा भजनरत्न बुवा श्री.भालचंद्र केळुसकर यांनी काही भजनी कलाकार यांच्या समस्या नेते मंडळी यांच्यासमोर मांडल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
तसेच तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेली आहे परंतु त्याचप्रमाणे आजच्या भजन महोत्सव कार्यक्रमास नवोदित तरुण कलाकार यांची उपस्थिती बघून आपला उर भरून आला त्याचप्रमाणे भजनकला ही संतांची परंपरा आहे या भजनकलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन होते असे गौरोद्गार काढले. शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब यांनी हे झाड लावलं आहे त्याच लवकरच रोपट्यात रूपांतर करावं असा सल्ला यावेळी श्री.रुपेश पावसकर यांनी दिला.यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख यांनी आपल्या भाषणात भजन कला ही अशी कला कला आहे की परमेश्वराच्या हृदयाजवळ जाण्याची आपल्याला संधी मिळते.भजन संस्कृती जपण्याचे काम आपली भजन संस्कृती करते.ज्या घरात पेटी,पखवाज, टाळ ही साधने असतात त्या घरात परमेश्र्वराचा वास असतो, असे गौरवद्गार काढले.या कार्यक्रमात भजन सेवा करण्याची सुरुवात श्री.धोंडी सातार्डेकर यांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने केली. तद्नंतर बुवा श्री.प्रमोद हर्याण,श्री.गोपी लाड,श्री.जयवंत राऊळ,श्री.नारायण ठाकूर,श्री.सुनील लब्दे,श्री.संदीप करवडेकर,श्री.महेश वेंगुर्लेकर,श्री.श्रीधर मुणगेकर,श्री भगवान लोकरे,श्री.सुहास नाईक,श्री.चिन्मय माधव,श्री.बाळू कांडरकर यांनी आपली भजन रुपी सेवा केली.
या भजन महोत्सवात नवोदित कलाकार कु.गौरी मोहिते, कु.यश कुडाळकर,श्री.संतोष परब यांनी आपली अभंग रुपी कला सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.त्यांना पखवाजसाथ/तबलासाथ करणारे कलाकार श्री.संदेश सुतार,श्री.विशाल केळुसकर,श्री.विजय सावंत,श्री. बबलू परब,राजेश पावसकर,सुयश सावंत यांनी या कार्यक्रमासाठी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट निवेदक श्री.राजा सामंत,श्री. मोठ्या यांनी कार्यक्रमाला आपल्या भाषाशैलीतून रंगत आणली. या कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री.दीपक भाई केसरकर यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या सांगतेच्या पूर्व संध्येला पिंगुळी मठाचे कार्याध्यक्ष श्री.विठोबा राऊळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे यशस्वी पार पाडणारे श्री.संजय करलकर,भजन संघटना जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब, उपाध्यक्ष श्री.संजय सावंत,शिवसेना भजन संघटना संस्थापक श्री.अरविंद करलकर,श्री.संतोष परब यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. या कार्यक्रमाची सांगता बुवा श्री.केशव मोहिते यांच्या भैरवी गायनाने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा भजनरत्न श्री.भालचंद्र केळुसकर, मुंबई अखिल सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष बुवा श्री.भगवान लोकरे, बुवा श्री.प्रमोद हर्याण, सेक्रेटरी बुवा श्री.सुनील लब्दे, उपाध्यक्ष बुवा श्री.श्रीधर मुणगेकर, सल्लागार श्री.जयवंत राऊळ, सल्लागार श्री.नारायण ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना विश्वस्त श्री. गोपी लाड बुवा, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.निलमताई शिंदे, सौ.रुद्रा पावसकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा भजन संघटना संस्थापक श्री.अरविंद करलकर, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे, नारुर शाखाप्रमुख श्री.विठ्ठल शिंदे, शिवसेना प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट ओबीसी सेल जिल्हाप्रमुख श्री.सर्वेश पावसकर, शिवसेना उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्री.रामकृष्ण उर्फ मामा गडकरी, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर, शिवसेना महिला आघाडी विभाप्रमुख श्रीम.शुभांगी तेंडुलकर, सौ.आशू अग्रवाल तसेच नवोदित तरुण कलाकार, मान्यवर मंडळी, कुडाळ तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.