मालवण :
मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन जयराम बोवलेकर (वय वर्षे ५७) यांचे आज अल्पशा आजाराने पणजी येथे निधन झाले. मालवण शहरातील धुरीवाडा येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने एसटी कर्मचाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे त्यांच्या निधनाची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनी पणजी गोवा येथे जात अंत्यदर्शन घेतले.
मालवण एसटी आगारातून जास्तीत जास्त लांब पलल्याच्या गाड्या चालवण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी बोवलेकर यांचा सतत प्रयत्न होता. आगारप्रमुख असूनही सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.
बोवलेकर हे सच्चू या नावाने परिचित होते. एसटी निवृत्त अधिकारी राजाराम बोवलेकर यांचे ते मुलगी एलआयसी विभागातील अधिकारी सतेजा बोवलेकर यांचे ते पती होत. त्यांच्या मागे वडील पत्नी मुलगा मुलगी अशा परिवार आहे.