You are currently viewing निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांची अचानक बदली…

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांची अचानक बदली…

ग्रामस्थांकडून विरोध;बदली तात्काळ रद्द करा अँटी करप्शनची मागणी…

सावंतवाडी

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीवनी लंबे यांची अचानक बदली करण्यात आली आहे.या बदलीला ग्रामस्थांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.तात्काळ ही बदली रद्द करण्यात यावी,अन्यथा आंदोलन करू असा इशारा अँटिकरप्शन फाउंडेशन कडून देण्यात आला आहे.याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,
निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मळगाव, तळवडे,नेमळे,ओटवणे, माजगाव,वेत्ये ही गाव येतात.या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे व डॉ.विक्रम म्हस्के हे दोन्ही अधिकारी आल्यापासून रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत आहे.त्यामुळे रुग्णांना वारंवार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जाव लागत नाही. अशा चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांची अचानक बदली करून दशक्रोशीवर अन्याय केला जात आहे.त्यामुळे ही बदली तात्काळ रद्द करा,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी फाऊंडेशनचे सावंतवाडी तालुका प्रेसिडेंट एकनाथ चव्हाण, व्हाईस प्रेसिडेंट संतोष तळवणेकर,सावंतवाडी तालुका प्रेस प्रेसिडेंट शैलेश मयेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा