*इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीने मनोरंजनातून जोपासली मानवता*
पिंपरी
सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) या आजाराने समाजातील असंख्य महिला व्याधिग्रस्त आहेत. विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना त्यासाठी विनाशुल्क उपचार मिळावेत म्हणून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी या संस्थेने ‘रोमान्स के रंग डॉक्टर्स के संग’ या चित्रपटगीतांच्या विशेष मैफलीचे निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन केले होते. मंजुषा शर्मा, इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष शालिनी चोप्रा, सचिव मधुरा प्रधान यांच्यासह क्लबच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपले वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून सुमारे चोवीस वर्षांपासून संगीत वाद्यवृंदाच्या माध्यमातून मनोरंजन आणि गरीब रुग्णांची विनाशुल्क वैद्यकीय सेवा करणार्या या समूहात डॉ. सुप्रिया गाडेकर, डाॅ. चंद्रकांत आठले, डॉ. धनश्री कोंढरे, डॉ. विनोद शेलार, डॉ. विभा देशपांडे, डॉ. अब्दुल खान, डॉ. वैयजंती गद्रे, डॉ. अखिलेश आठले हे गायक कलाकार आणि डॉ. दसमित सिंग, डॉ. कमलेश बोकील, डॉ. तेजस जोशी, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, डॉ. मिहीर भडकमकर, डॉ. मोहित नामजोशी, डॉ. संजय खाडे या वादक कलाकारांचा समावेश होता. जागतिक मैत्रीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या बहारदार मैफलीचा प्रारंभ प्रत्येक श्रोत्याला मैत्रीबंधाचे प्रतीक (फ्रेंडशिप बँड) प्रदान करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. शालिनी चोप्रा यांनी प्रास्ताविक केले.
“गुलाबी ऑंखे जो तेरी देखी…” या पहिल्याच गीताला वन्स मोअर मिळवत सुरू झालेली ही शृंगारिक गीतांची मैफल, “मेरे ख्वाबों में जो आये…” , “रुक जा ओ दिल दिवाने…” , “लेकर हम दिवाना दिल…” , “भली भली सी एक सुरत…” , “वादा करो नहीं छोडेंगे मेरा साथ…” अशा एकाहून एक प्रणयरम्य गुलाबी गीतांनी रंगत असताना “मोरनी बागामां…” या पारंपरिक राजस्थानी लोकगीताने अधिकच श्रवणीय झाल्यानंतर “आता वाजले की बारा…” या मराठमोळ्या लावणीमुळे मैफलीने कळसाध्याय गाठला. लावणीतील स्वरांचे लावण्य अन् त्याला अप्रतिम ढोलकीवादनाची साथ यामुळे क्लबच्या पदाधिकारी महिलांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करीत प्रतिसाद दिला. संगीत हे भाषेचा अडसर दूर करून मनामनात पोहोचते याचा प्रत्यय “सुनो सॅनरिटा…” या स्पॅनिश भाषेतील गीताला जी जोरदार दाद मिळाली त्यावरून आला. “कहे दू तुम्हें या चुप रहूं…” , “पुरा लंडन ठुमकदा…” , “परदेशीया, ये सच हैं पियां…” , “कजरा मोहब्बतवाला…” , “कजरा रे कजरा रे…” , “पियां तू अब तो आजा…” अशा एकल, युगुल, समूह गीतांच्या धुंदीने मंत्रमुग्ध करणार्या या मैफलीचा समारोप भारतीय सैनिकांना अभिवादन करणार्या “हवन करेगें…” या समूहगीताने करण्यात आला. इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने नरसिंह फाउंडेशन या संस्थेला गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराप्रीत्यर्थ आर्थिकनिधी सुपूर्द करण्यात आला. डॉ. चंद्रकांत गद्रे आणि डॉ. मानसी अरकडी यांनी मैफलीचे खुमासदार निवेदन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*