*ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील आदर्श शिक्षिका सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण महिना*
स्वागत
श्रावण महिन्याचे
सण, उत्सव, पंरपरा
समारंभाचे
श्रावणात सोमवारचा
उपवास
भगवान शंकराची
भक्ती करु खास
सगळीकडे निसर्ग
सुंदर
पावसाच्या आगमनाने
झाले हिरवेगार
विविध रंगांची
विविध फुले
आनंदाने
नाचतात मुले
फुलांचा मग
चौफेर सुगंध
जीवनात भरु या
प्रेम, आनंद, उत्साहाचा रंग
श्रावणात विसरु
भांडणं तंटे
दूर करु
एकमेकांचे संकटे
श्रावणात वाटू
आपण आनंदी आनंद
जीवन होईल
सुखी संपन्न
अनुपमा जाधव