*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावता माळी*
मळा फुलांचा सजवी
संत सावतमाळी
विठ्ठलाचे नाम घेई
सकाळी नि सायंकाळी
हाती त्यांच्या मोटनाडा
धाव्यावरी मोट चाले
पाटाचं पाणी वाहते
बहरली पाने फुले
पिवळी शेवंती फुलली
रानंवेली उमलल्या
सावत्यांच्या अभंगात
जाई, जुई बहरल्या
पाटाच्या पाण्यात उभा
गातो विठ्ठलाचे गाणं
अभंग गात गातां
नचं स्वतःचे भान
भोळा सांब शेतकरी
सेवा निष्ठ सावतोबा
त्याच्या संगे बारे देई
पंढरीचा देव विठोबा
भक्त रांगुनिया जाई
टाळ वीणा भजनात
विठ्ठल नित्य उभा
सावत्याच्या अंतरात
पंढरीचा पांडुरंग
नांदे सावत्याच्या घरी
त्याच्या भक्तीसाठी देव
राही हृदय मंदिरी
म्हणे सावता मुखात
कर्म करीत राहावे
ज्याच्या त्याच्या स्वधर्माने
मोक्ष पदास पोहचावे
*शीला पाटील. चांदवड.*