*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लावणी*
*लावणी*
पहिल्या पावसाच्या पहिल्याच धारा
ह्यो सुटला बघा कसा थंडगार वारा!। ध्रु।
रोखू नका तुम्ही नजरेचा बाण राया
झाली घायाळ मैना जाईल पोर वाया
अवखळ पोरं ही वेचत होती गारा
ह्यो सुटला बघा कसा थंडगार वारा। १।
ढगांच्या तालावर ही नर्तन करते
विजांच्या भीतीने मिठीत शिरते
लाजली धरती तुटला आकाशी तारा
ह्यो सुटला बघा कसा थंडगार वारा। २।
पावसाच्या सरींनी भिजवली ही काया
तुमच्यावर जडली प्रीतवेडी माया
तुमच्याचसाठी मांडीला खेळ हा सारा
ह्यो सुटला बघा कसा थंडगार वारा। ३।
*✒️©सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*