You are currently viewing शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्यावतीने ४ ते ११ ऑगस्ट भगवा सप्ताह – संदेश पारकर

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्यावतीने ४ ते ११ ऑगस्ट भगवा सप्ताह – संदेश पारकर

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्यावतीने ४ ते ११ ऑगस्ट भगवा सप्ताह – संदेश पारकर

विधानसभा मतदार संघ निहाय सभासद करणार ; शिवसेनेच्या पदाधिका-यांवर जबाबदारी

कणकवली

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा सप्ताह ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताह मध्ये नव्याने विधानसभा मतदार संघ निहाय ५० हजार सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. पक्षाच्या पदाधिका-यांच्या नेमणूका या काळात केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवे वातावरण जिल्ह्यात या निमित्ताने करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली येथील विजय भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ,
कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांच्यावर ५ ते ६ मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अतुल रावराणे यांच्यावर ५ जिल्हा परिषद मतदारसंघ , युवानेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यावर ४ जिल्हा परिषद मतदार संघ व माझ्यावर ४ मतदार संघाची जबाबदारी आहे. या सप्ताहात उपनेते गौरीशंकर खोत , निलम पालव सावंत , व कणकवली , वैभववाडी , देवगड , मालवण या ४ तालुक्यातील पदाधिकारी सभासद नोंदणीच्या कार्यक्रमात अग्रभागी राहून काम करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवार निवडीबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे लवकरच घेतील. कणकवली विधानसभा मतदार संघात ४ ते ५ जन इच्छूक असून सर्वचजन पक्षासाठी काम करत आहेत, ख-या अर्थाने ही शिवसैनिकांची ताकद आहे. त्यानुसार जास्त इच्छूक असतात. त्यावेळी पक्षाचे काम वाढलेले आहे. पक्षमुख श्री. ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाल मान्य असेल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत. त्यामुळे नागेश मोरये यांना कॉगेस पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, मात्र अंतिम निर्णय राज्यस्तरावर होईल असे संदेश पारकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा