You are currently viewing काव्यपुष्प-८९ वे

काव्यपुष्प-८९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-८९ वे*

—————————————–

श्री महाराजांनी उद्देशाने राम मंदिरे स्थापिली । या मागची

कल्पना प्रत्यक्षात आणिली । अध्यात्म केंद्रे झाली । तर रक्षण होईल परंपरांचे ।। १ ।।

 

उपासना नियमित व्हावी । नाम साधना इथे चालावी ।

भक्त-मनातली निराशा जावी । मंदिरात येता ।। २ ।।

 

या ध्येयपूर्तीसाठी मंदिरे झाली । नाम- साधनेची गोडी लागली । अध्यात्माची रुची वाढली ।भक्तांच्या मनात ।। ३ ।।

 

जुने इंदूर, पंढरपूर। कुर्तकोटी ,कुरावली इथे झाले मंदिर ।

मांडवे, गोमेवाडी, आटपाडीला मंदिर । स्थापिले महाराजांनी ।।४ ।।

 

अशी झाली मंदिरं । चाले इथे नामाचा गजर । भक्त नि साधक होती हजर । श्री रामाच्या सेवेसाठी ।। ५ ।।

 

अशा धामधुमीत एक झाले । दम्याच्या त्रासाने डोके वर काढले । श्री महाराज बेजार झाले । दम्याच्या आजाराने ।। ६ ।।

या दम्याच्या कारणे । महाराजांना होती जागरणे ।ना होई कमी हे दुखणे । सहन करिती त्रास श्री महाराज ।। ७ ।।

 

दिवस सुरू होई। दिनक्रम अखंड चालू राही । लक्षणे दिसो नाही। रात्रीच्या त्रासाचे ।। ८ ।।

 

कोणी होई भजनी बेसूर । ही तर भजनात कसूर ।

अशा वेळी श्री महाराज स्वतः लावीती सूर । मग रंग भरे

भजनात ।। ९ ।।

 

*************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

——————————————

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.

——————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा