सिंधुदुर्ग :
गणेशोत्सवात गावी येऊ इच्छीणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल १८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांना थांबेही भरपूर आहेत. मात्र, चाकमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष गाड्यांपैकी सात गाड्यांचे थांबे वाढविण्यात आले आहेत. हे थांबे पेण आणि सिंधुदुर्गातील झाराप या स्थानकावर देण्यात आले आहेत. यात सीएसएमटी-सावंतवाडी- सीएसएमटी डेली (०११५१ / ०११५२) या गाडीला पेण आणि झाराप, सीएसएमटी-रत्नागिरी- सीएसएमटी डेली (०११५३ / ०११५४) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी डेली (०११६७ / ०११६८) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी त्रिसाप्ताहिक (०११८५ / ०११८६)
गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ- एलटीटी साप्ताहिक (०११६५ / ०११६६) गाडीला पेण, एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी डेली (०११७१ / ०११७२) गाडीला पेण आणि झाराप, आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या मुंबई सेंट्रल-सावंतवाडी- मुंबई सेंट्रल (०९००९ / ०९०१०) या गाडीला झाराप स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव स्पेशल गाड्यांपैकी रत्नागिरी-सीएसएमटी डेली (०११५४) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. मात्र, ही गाडी २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. तसेच कुडाळ-एलटीटी डेली (०११६८) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. ही गाडीही २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.