You are currently viewing चराठेतील जखमी बिर्जे कुटुंबीयांना केसरकर मित्र मंडळाकडून मदत…

चराठेतील जखमी बिर्जे कुटुंबीयांना केसरकर मित्र मंडळाकडून मदत…

चराठेतील जखमी बिर्जे कुटुंबीयांना केसरकर मित्र मंडळाकडून मदत…

सावंतवाडी

अंगावर भिंत पडून जखमी झालेल्या चराठे-गावठणवाडी येथील बिर्जे कुटुंबीयांना आमदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे. काल पहाटे भिंत अंगावर कोसळल्यामुळे बिर्जे कुटुंबातील यशवंत व गणपत बिर्जे हे दोघे बापलेक जखमी झाले होते. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज ही त्यांना मदत देण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, उपतालुका प्रमुख संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख उमेश गांवकर, कोलगांव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत, सरपंच सौ. प्रचिती कुबल, उपविभाप्रमुख राजु कुबल, चराठा शाखाप्रमुख राजन परब, कुणकेरी शाखाप्रमुख नारायण सावंत, बुथप्रमुख प्रशांत बिर्जे, उमेश परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा