अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात…
इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई: 70 लाखाचा मुद्देमाल जप्त..
बांदा
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या
मद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 70,13, 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
नोशाद खान (वय 24) हरियाणा व विष्णू जाट (वय 25) राजस्थान असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.