You are currently viewing शीर्षक: श्रावण आला…

शीर्षक: श्रावण आला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*शीर्षक:- श्रावण आला…*

 

मास पाचवा पावन

आला श्रावण श्रावण…

कसे नंदी-बैलावरी

शिव आरूढले छान…।। १ ।।

 

उपरांत आषाढाच्या

लागे सणांची चाहूल…

लड श्रावणी सणांची

जनीमनी कुतूहल…।। २ ।।

 

रिमझिमत्या सरींची

चाले उघड-झापड…

वर्षाराणी मधुभाषी

कधी दाविते अकड…।। ३ ।।

 

आली वसुंधरा राणी

साज शृंगार करून…

ल्याली नववधू जशी

शालू हिरवा नेसून…।। ४ ।।

 

पाठी नागपंचमीच्या

सण रक्षाबंधनाचा…

मधे दिन स्वातंत्र्याचा

सर्व जनां आवडीचा…।। ५ ।।

 

सणासुदीची हो माळा

फुलविते गोतावळा…

रम्य सुंदर सोहळी

सजे आनंदाचा मेळा…।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा