मसुरे :
उबाठा शिवसेनेचे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून मसुरे येथील जिल्हा परिषदच्या प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मसुरे केंद्र शाळा नंबर एक, जिल्हा परिषद शाळा कावावाडी, जिल्हा परिषद शाळा खाजणवाडी, जिल्हा परिषद शाळा चांदेर, जिल्हा परिषद शाळा मागवणे, सदरचे वह्या वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी वह्या वाटप करून सहकार्य केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे येण्यासाठी उभाठा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या वितरण प्रसंगी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर, युवती सेना मसूरे विभाग प्रमुख आर्या गावकर, सुहास पेडणेकर उपविभाग प्रमुख आयवन फर्नांडिस, सौ मामी पेडणेकर, दिनेश बागवे, सिद्धेश मांजरेकर, मसुरे केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत ,श्री गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर, बेडेकर मॅडम, मयूर वंजारे, दिनेश बागवे आणि उभाठा शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी पालक उपस्थित होते.