भेडशी पुलावरून कार वाहून दोन जण अडकले…
पोलीस अधिकारी यांचे कडून दोघांना वाचविण्यात यश
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून
आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पाणी आलेले असून सदर पुलावर दोन युवक कार मध्ये अडकून पडले होते. अशी माहिती मिळताच त्यांना तात्काळ पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस हवालदार विठोबा सावंत, पोलीस हवालदार सुतार, पोशी, अनिल कांबळे असे तत्काळ लाईफ जॅकेट, दोर, रिंग अशी साहित्य घेऊन घटनास्थळ भेडशी जुना पूल येथे पोहोचले. सदर ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेली स्थितीत दिसून येत होती. सदर कार मध्ये दोन युवक हे अडकून होते. सदर पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्या कारणामुळे भेडशी वरच्या पुलावरील रस्त्यावर टीम गेली तेथे पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसाने स्वतः रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर सदर बुडणारे इसमंकडे फेकला त्यांनी तो दोर कारला बांधला, व दोघांना वाचविण्यात यश आले आहे हि घटना सकाळी घडली.
दरम्यान पो.हवालदार विठोबा सावंत,पो. निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक आशिष भगत, पो. हवालदार सुतार, पो हवालदार राम मळगावकर, पो.शी.अनिल कांबळे व ग्रामस्थ यांनी मिळून दोर टाकून सदरचा दोर कारला बांधून त्या दोरच्या साह्याने सदर दोन बुडत असणारे इसमांना सुखरूप बाहेर काढले. सदर वाचणाऱ्या इसमांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) मशनु गंगाराम कांबळे , वय – 30 वर्षे , राहणार- रवळनाथ मंदिर जवळ, आसगाव,नांदोडे, तालुका चंदगड, 2) ज्ञानेश्वर नागोजी हळवनकर, वय 25 वर्षे, राहणार -रवळनाथ मंदिर जवळ, आसगव, नांदोडे, तालुका- चंदगड असे सांगितले
त्यांना सदर घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ते त्यांच्या जीप मधून जात होते समोर असलेली कार चालक यांनी त्यांचे वाहन पुराच्या पाण्यात घातले व ते अडकले ते बुडू लागले होते त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली व सदर वाहनातील कार मधील इसमांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने सदर दोन्ही इसम हे पुराच्या पाण्यात अडकले होते अशी माहिती दिली
सदर दोन्ही इसम सुखरूप बाहेर काढले असून. कार मांलक यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी , राहणार – गाजियाबाद, युपी असे सांगितले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढले व ते पाण्यात अडकले.
सदरचे भेडशिला जाणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बेरिकेट्स लावून बंद केले आहेत. योग्य तो बंदोबस्त नेमला आहे. तरी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासन यांनी केले