You are currently viewing दिव्यांगातील अंतरंगित भाव उलगडणारी लेखक रुपेश पवार यांची मुलाखत.

दिव्यांगातील अंतरंगित भाव उलगडणारी लेखक रुपेश पवार यांची मुलाखत.

दिव्यांगातील अंतरंगित भाव उलगडणारी लेखक रुपेश पवार यांची मुलाखत.

नौपाडा वाचक कट्ट्यावर साहित्यिक, पत्रकार अॅड रुपेश पवार यांची मुलाखत मंगळवार दि. ३० जुलै २०२४ ला सायंकाळी संपन्न झाली. ही मुलाखत साहित्यिका, निवेदिका डॉ. अंजुषा पाटील यांनी सुसंवादी शैलीतून अप्रतिम घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा निमकर यांनी केले. नौपाडा वाचक कट्ट्याच्या संध्या किरण नाकती मॅडम आणि नौपाडा वाचक कट्टा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

रुपेश पवार यांनी अत्यंत विनम्र भावनेने ही मुलाखत देऊन, उपस्थित ठाणेकरांची मने जिंकली.
आपल्याला दिव्यांगत्व कसे आले. त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या पालकांनी कशाप्रकारे मेहनत घेतली. पुढे माझा उच्च शिक्षणाचा टप्पा कसा मी गाठला. याबद्दल सांगताना रुपेश पवार यांनी श्रोत्यांशी सुंदर असा संवाद साधत आपले सकारात्मक विचार मांडले. त्यांचा पहिला ‘अंतरंग’ हा काव्यसंग्रह कसा प्रकाशित झाला. ज्येष्ठ साहित्यिकांचे आशीर्वाद कसे त्यांना मिळत गेले. त्यांच्या बहुचर्चित ‘वलयांकित’ श्रद्धांजलीपर संग्रहाची निर्मिती आणि त्यातील कलाकारांबद्दल श्रद्धात्मक भाव त्यांच्या मनात कसे होते व आहेत हेही पवार यांनी बोलताना सांगितले. या वलयांकित
पुस्तकाचे ठाण्यात अभिवाचनाचे दहा ते बारा प्रयोग कसे झाले. याबद्दलही पवार यांनी प्रकाश टाकला.
आपल्या अभंग भावार्थ ह्या पुस्तकाबद्दलही त्यांनी सांगितले. म्हणजे रुपेश पवार हे आध्यात्मिक, ऐतिहासिक, कला, साहित्य या सर्व क्षेत्रांवर कायम लिहीत आले आहेत. ठाणे वैभव वृत्तपत्र परिवाराशी रुपेश यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

आपण जे लिहितो ते माणसाला व्यक्त करता आले पाहिजे. पुरस्कार हे साहित्यिकाच्या कौतुकासाठी असतात पण लेखकाने कायम विनम्र राहिले पाहिजे, हे पवार यांनी आवर्जून सांगितले. रुपेश पवार हे गीत, कथा, ललित लेख, कविता असे सर्व काही लिहीत असतात, तरीही ही व्यक्ती नम्र होऊन लोकांना त्यांच्या लेखन कार्यात सहकार्य करते. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दिव्यांग बांधवांबद्दल बोलताना ते म्हणाले, दिव्यांगांमध्ये एक न्यूलगंड असतो. कारण त्यांना आजूबाजूचे लोक सामावून घेत नाहीत. त्यांना सामावून घेण्याची गरज आहे. मग त्यांचा न्यूलगंड नाहीसा होईल. किरण नाकती सर नेहमी दिव्यांगांसाठी तोच प्रयत्न करत असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देतात हे महत्त्वाचे आहे. असे रुपेश पवार यांनी प्रतिपादन केले. पवार हे स्वतः दिव्यांग असताना सकारात्मक विचाराने जीवन जगतात. असे जीवन जगणे ही एक सगळ्यात मोठी कला आहे. ती कला रुपेश पवार यांना अवगत आहे असे वाटते. सूत्रसंचालन करणाऱ्या अपर्णा निमकर यांनी शेवटी रुपेश पवार यांच्या बद्दल कौतुकाचे उद्गार काढले. संध्या नाकती यांनी रुपेश यांच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन त्यांना आशीर्वाद दिले. असा हा मुलाखत कार्यक्रम नौपाडा वाचक कट्ट्यावर पार पडला. हा मुलाखत वृत्तांत पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी प्रसिद्धीस दिला आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…

🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️

*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*

▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_

* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_

* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_

⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕

*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*

अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…

https://wa.me/919766670706

-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा