You are currently viewing स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे ६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे ६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

*स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे ६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन*

*स्थानिक डीएड टीईटी, सीटीईटी पात्रताधारकांना सामावून न घेतल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार*

सिंधुदुर्ग

स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्यावतीने स्थानिक टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांच्या हक्कासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे.
टीईटी अपात्र असणाऱ्या डीएड धारकांना जिल्हा परिषदेवरील कमी पटाच्या शाळांवर १५ हजार मानधनावर नियुक्ती देण्याबाबतची समाज माध्यमातील बातमी वाचनात आल्यानंतर त्या बातमीतील आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील २१५ उमेदवारांची यादी शासनाकडे दिल्याचे सांगितले. त्या यादीत टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांची नावे आढळून आलेली नाहीत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश उमेदवार हे टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक आहेत हे सदर आंदोलकांकडून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकच नाहीत असे चित्र सर्वांसमोर दाखविण्यात आले. यामुळे या नियुक्तीच्या वेळी पात्र उमेदवारांवर अन्याय होणार आहे. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी सदर आंदोलन करून शासनाकडे दाद मागितली जाणार आहे. शासनाने डावलून निर्णय घेतल्यास न्यायालयाचे दरवाजे ही ठोठावणार अशी तयारी समिती मार्फत जाहीर करण्यात आली आहे.
सदर आंदोलनास बहुसंख्येने टीईटी/सीटीईटी अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांनी व त्या २१५ यादीत समावेश नसलेले डीएड TET अपात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केलेले आहे.

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा