‘फोम इंडिया’चं सर्वेक्षण
कुडाळ :
सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत हे पुन्हा एकदा लोकप्रिय खासदार ठरले आहे. फोम इंडिया – एशिया या फोमच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत २५ खासदारांच्या नावात राऊत यांचा समावेश आहे.
या फोमच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यात २५ खासदारांची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक काम, प्रभाव, प्रतिमा शैली, सभागृहात केलेले कामकाज असा निकष लावण्यात आला होता. यात त्यांचे काम चांगले ठरवण्यात आले आहे.