You are currently viewing संत सोयराबाई

संत सोयराबाई

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संत सोयराबाई*

 

चोखोबांची महारीण

म्हणवी जरी स्वतःला

अस्तित्व तरी स्वतंत्र

संत सोयराबाई

-१-

ब्याण्णव अभंग तिचे

साधी सोपी रस भाषा

वर्ण भेदा साठी बंड

आत्मा नसे अशुद्ध

-२-

ज्ञानार्जन हे विशुद्ध

ज्ञानाची आस बाळगे

जगण्यातले वास्तव

सवतासुभा नसे

-३-

खाली पायरी मंदिरी

वाद घालते देवाशी

ठबके मार वेदना

अढळ स्थान परि

-४-

रोखठोक प्रश्न तिचे

अपत्य नव्हते पोटी

म्हणून ती कासावीस

कर्ममेळा जन्मला

-५-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

द्वारा डॉक्टर साई प्रसाद बाबू

अनिका पिकॅडिली

ए-५०३

पुनावळे, पुणे-४११०३३

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा