*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित मैत्री दिनानिमित्त अप्रतिम काव्यरचना**
*आठवण मैत्रिणीची*
सन्मान जीचा करावा
अशी मैत्रीण माझी
किती कौतुक करावे
किर्ती मोठी तुझी
होती एक मैत्रीण माझी
जीवाची नि भावाची
सर्वांची ती आवडीची
जात ना धर्म पाळायची
होती ती म्हणून रुसले
तिनेच डोळे माझे पुसले
मैत्री प्रेमाने मन भरले
डोळे अश्रूंनी भरून आले
होती ती सावरायला
म्हणून आवडलं पडायला
होती ती मनवायला
म्हणून आवडले रुसायला
होती ती समजुन घ्यायला
म्हणुन आवडलं चुकायला
होती ती ऐकायला
म्हणुन आवडलं बोलायला
नाही आज ठाऊक मला
आहे कुठे ती राहायला?
शपथ मैत्रीची देवा तुला
दीर्घायुष्य दे तीला
*शीला पाटील. चांदवड* .