*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुरू होता संसद हल्ली*
सुरू होता संसद हल्ली
आदर्श ठेवतील कां यांचा
गांधीजींना होते माहित
वकूब नाही खासदारांचा
माणसा पेक्षा माकडे बरी
शिस्त तरी पाळतात नीट
कोणी न बोलतो वचावचा
ऐकणाराना *येतो वीट*
सोडून मुद्याचे सर्व बोलती
संंधी मिळताच तुटून पडती
मार्शल करवी कितीक जण
बाहेरची ती वाट पकडती
पहाणी करता मच्छीमार्केटची
सुधारणा आहे म्हणतात सर्व
उसना घेतला तेथील गोंधळ
गळून पडतो संसदेत *गर्व*
ऐकून *सांसद* काहीबाही
आरोप करती *बेछुटपणे*
आवाज दबतो नवख्यांचा
क्रमप्राप्त होते गप्प बसणे
सरावलेले *भिडू* नेहमी
भिडतात अस्तन्या सावरून
होते लढाई घमासान तेव्हा
उरत नाही कुणास *भान*
औषध जालीम रोज देऊनी
सभाध्यक्ष येती काकुळतीला
कसे समजवावे खासदारांना
प्रश्न दिसतो त्यांना पडलेला
तीन माकडांकडे करून बोट
इशारा मिळतो “राडेखोरांना”
सदा सुखी जे असतात कोणी
जुमानत नाहीत ते सूचनांना
विनायक जोशी✒️ ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७