भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने मालवण नगरपरिषदेला हत्तीरोग निर्मूलनासाठी अत्यावश्यक ‘मिस्टब्लोअर’ मशीन स्वखर्चाने उपलब्ध
मालवण :
मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आले या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. उपाययोजना केल्या जात आहेत. औषधं फवारणीसह हत्तीरोग निर्मूलनासाठी मालवण नगरपरिषदेला अत्यावश्यक ‘मिस्टब्लोअर’ मशीन भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून देत नगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, निलेश राणे यांनी नगरपरिषद प्रशासन आरोग्य विभाग अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. हत्तीरोग निर्मूलनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती घेतली. काही कर्मचारी यांची कमी नगरपरिषद याठिकाणी आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधतं समस्यां दूर करण्याबाबत सांगितले. तसेच आवश्यक ते सहकार्य करू असे निलेश राणे यांनी आश्वस्त केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, पंकज सादये, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, पुजा वेरलकर, अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, अमिता निव्हेकर, पराडकर, जॉन नरोना, तारका चव्हाण, ममता वराडकर, आबा हडकर, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, विक्रांत नाईक ल, नारायण लुडबे, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, भाई मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक क्षमतेने औषधं फवारणी होईल
मालवण नगरपरिषद हद्दीत छोट्या मशीन साहाय्याने औषध फवारणी करताना वेळ व श्रम जादा होत असतात. या नव्या मशीनमुळे जास्त लांब अंतर व फवारणी करणे शक्य होणार आहे. असे सांगत नगरपरिषद अधिकारी यांनी आभार मानले.