*कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे… सेवा जनतेची….*
*डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहरात औषध फवारणी*
मालवण शहारात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून हत्तीरोग रुग्ण सापडून आले आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यतत्पर आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहारात डासप्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी मालवण फोवकांडा पिंपळ येथे जेष्ठ पदाधिकारी भाई कासवकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून या औषधं फवारणी मोहिमेची सुरवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, भाई कासवकर, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, पॉली गिरकर, यशवंत चिंदरकर, साईनाथ वाघ, निनीश चव्हाण, राजेश वाघ, राजा इब्रामपूरकर, नाईक साटम यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
नगरपरिषद प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप करत मंदार केणी म्हणाले प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात कमी पडत असले तरी आमदार वैभव नाईक जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडून मालवण शहरातील आरोग्य यंत्रणा व उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला. आता मालवण शहरात सर्वत्र औषधं फवारणी व अन्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.
नगरपरिषद स्तरावरून होणाऱ्या उपाययोजना बाबत नागरिक नाराज आहेत. त्यामुळे प्रशासनाची वाट न बघता आमदार वैभव नाईक यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही डास फवारणी मोहीम सूरू केल्याचे यतीन खोत यांनी सांगितले. यापूर्वीही कोरोना काळ, वादळ असो अथवा कोणतीही आपत्ती असो आमदार वैभव नाईक जनतेच्या मदतीसाठी सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिले आहेत. आताही जनतेची सेवा याच उद्देशाने त्यांचे कार्य सूरू असल्याचे यतीन खोत यांनी सांगितले.