*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खंत न राहो गेले द्यायचे राहून*
द्यायचे नच राहून जावो
शुद्ध ते देणे एकमेकांना |
जे जे उत्तम देण्यासारखे
ते ते द्यावे गरजवंतांना ||१||
करावे नेतृत्व शांततेने
तरुणांनी गाव तालुक्याचे |
ज्ञान घेऊन मानवतेचे
जिल्हा राज्य समग्र देशाचे ||२||
वृद्धांनीही तरुण होऊनि
ज्ञानाने विकासात रहावे |
अमृततुल्य हे ज्ञानधन
देशास मानवतेला द्यावे ||३||
देणाऱ्याने देतच रहावे
घेणाऱ्याने दातृत्वच घ्यावे |
देणे घेणे हवे मांगल्याचे
मानव सारे एकरुप व्हावे ४||
देण्यासारखे प्रत्येकापाशी
आहेच प्रत्येक क्षणी मूल्य
मधु फळे शुद्ध बिजापोटी
रसाळ सत्वा अमूल्य ते मूल्य ||५||
नरनारी ते होऊनि ज्ञानी
विज्ञान अध्यात्म बहु शास्त्रे |
सकल घेती शुद्ध जाणूनि
स्वकुल देश गौरवा शास्त्रे ||६||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे
फणसखोल, आसोली, ता.:- वेंगुर्ला,
जि.:- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.