*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*ओला दुष्काळ*
धो धो पडतो पाऊस
वाहतात जलधारा.
कुणास ठाऊक होता
पाऊसाचा चढे पारा.
येवढा झाला पाऊस
तुडुंब भरले नाले.
पिके गेलित वाहून
नयन झालेत ओले.
फुटले पाटबंधारे
नद्यांनाही आला पूर.
वाहून गेले सोबती
भरून आला हा उर
तांडवात पाऊसाच्या
संपला सुखी संसार.
कुणासाठी जगायचे
सगळीकडे अंधार.
गुरे वासरे सागळी
हंबरडे फोडतात.
मेलेल्या निर्जीव जिवा
अंतीम अग्नि देतात.
पडला ओला दुष्काळ
कंपावली वसुंधरा
पिके गेलीत वाहून
ओघळली अश्रुधारा.
देवारे हात जोडते
विनंती एकच तूला.
अंगात संपले प्राण
घेऊन चलना मला.
अंधाऱ्या रं जीवनात
अंधारातच जगणं.
आठवणींंचा अंधार
मरणाहुन मरणं.
एकच सांगते देवा
तुला मी पाहिलं नाही
सगळं गेलं वाहून
काहीच उरलं नाही.
मुठभर काळी माती
राहिली हातात माझ्या .
कंठाशी आलेत प्राण
कूशीत घेशील तूझ्या.
सौ भारती वाघमारे
मंचर
तालुका -आंबेगाव
जिल्हा -पूणे