You are currently viewing मोहिनी.. वर्षाराणी (अष्टाक्षरी रचना)

मोहिनी.. वर्षाराणी (अष्टाक्षरी रचना)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोहिनी.. वर्षाराणी* (अष्टाक्षरी रचना)

 

कशा भिजवी धरेला

चिंब पावसाच्या धारा…

नभी धावतीया मेघ

गातो गाणे वात-वारा…।। १ ।।

 

वर्षाराणी मोहिनीशी

सिंचे जल नभातून…

तृष्णा व्याकूळ धरित्री

करे अमृत प्राशन…।। २ ।।

 

आसमंती सर्वदूरी

घन ओथंबून आले…

रिमझिमत्या सरींनी

ओसंडली नदी-नाले…।। ३ ।।

 

दिसे जोमात वावरी

पीकं डोलतां खुशीत…

डोळी दुरूनीया रानं

स्वर्ग हिरवा प्रतीत…।। ४ ।।

 

शालू हिरवा नेसून

झाली धरा संजीवन…

ओठी हरेक जीवाच्या

गान उमलले छान…।। ५ ।।

 

बळीराजा सुखावला

पाहे पीकं डोलतानी…

घाले साकडे हरीला

होऊ दे रे आबादानी…।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा