You are currently viewing वालावल जि.प.मतदार संघातील महाविकास आघाडीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद…..

वालावल जि.प.मतदार संघातील महाविकास आघाडीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद…..

*वालावल जि.प.मतदार संघातील महाविकास आघाडीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद…..*

कुडाळ

वालावल जिल्हा परिषद मतदार संघा च्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आघाडीतील प्रमुख मान्यवर उपस्थित वालावल आय.वाय.शेख यांच्या घरी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथ उर्फ नाथा वालावलकर शिवसेना शाखाप्रमुख सुनील करवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रीय जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आय.वाय.शेख यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष प्रा.सचिन पाटकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली
या बैठकीत संघटनात्मक क्रिया प्रक्रिया वाढविण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच वालावल मतदार संघातील भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यात आला यामध्ये वालावल बस स्थानका च्या दरम्यान होणारे रिक्षा पार्किंग त्यामुळे बस वालावल बाजारपेठ मध्येच न जाता बाहेरून नेण्यात येते तसेच बस स्टॅन्ड ची शेड नादुरुस्त अवस्थेत आहे रिपेरिंग करण्यासाठी ग्रामसभेत सूचना देऊनही याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही तलाठी ऑफिस मोडकळीला आले आहे. गावासाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका व व्यायाम शाळा ही हरवली आहे. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना मोडकळीस आला असून वैद्यकीय अधिकारी नसल्याने बंद आहे इलेक्ट्रिसिटी ऑफिस मध्ये मनमानी कारभार नळ योजना निकृष्ट दर्जाचि नवीन योजनेचे काम अर्धवट. ठेकेदाराकडून उर्वरित पाईपची विक्री.. यामुळे नियमित पाण्याची व्यवस्था नाही क्षेत्रफळ वाढीतील पूल मोडकळीस आल्याने भविष्यात धोका उद्भवतो याकडे दुर्लक्ष. गावातील स्ट्रीट लाईट ७० टक्के बंद अवस्थेत दिसून येतात आणि प्रमुख महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेची सूचना जाहीरपणे दिली जात नसून सदस्यांपुरतीच मर्यादित ठेवून ग्रामसभा थोडक्यात आटोपली जाते या सर्व गोष्टींवर सखोल चर्चा करून आघाडीच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवण्यासाठी आपण संपूर्ण आघाडीच्या माध्यमातून संघटित होऊया आणि संघर्ष करूया व गाव विकासाचे व्रत हाती घेऊया अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वालावल सोसायटीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका उपाध्यक्ष राजन वालावलकर राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चैतन्य वालावलकर राष्ट्रवादी बुत अध्यक्ष मनोहर वालावलकर राष्ट्रवादी युवक सागर वालावलकर सेना उपशाखाप्रमुख रवींद्र कावळे उपशाखाप्रमुख विठ्ठल घारे वालावल संघटक सागर पाटकर युवा सेना अध्यक्ष हेमंत वालावलकर पूजा राऊळ बूथ प्रमुख विलास चौधरी दादू कोळंबकर सुनील नेरुरकर अण्णा करवडकर शमशुद्दीन शेख गोविंद पेडणेकर प्रमोद आडेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल घारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हेमंत वालावलकर यांनी मानले.

______________________________
*संवाद मीडिया*

_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…

🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️

*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*

▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_

* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_

* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_

⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕

*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*

अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…

https://wa.me/919766670706

-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा