You are currently viewing कधी वेळ मिळाला तर…..

कधी वेळ मिळाला तर…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कधी वेळ मिळाला तर…..*

 

जरा मागे वळ

उठेल बारीक कळ

बघ जरा तो सल…

कधी वेळ मिळाला तर…..

 

पहा सुंदर निसर्ग

भासेल तुला स्वर्ग

बघ जरा वळून….

कधी वेळ मिळाला तर….

 

गीताची कर गुणगुण

ऐक बासरीची धुन

मुग्ध हो मनातून…

कधी वेळ मिळाला तर…

 

नीरव सागर तटी

भरती कधी ओहोटी

निवांत निरखून घे….

कधी वेळ मिळाला तर…

 

जुने दिवस आठवेल

मोरपीस गाली हुळहुळेल

काळजात डोकावून बघ..

कधी वेळ मिळाला तर….

 

आईबाप भावंडं

आप्तेष्ट आहेत उदंड

जिव्हाळा आठव अंतरी…

कधी वेळ मिळाला तर….

 

समाजाप्रती आदरभाव

मिळतो तिथं,सन्मान, नाव

उपकार ते जाण…

कधी वेळ मिळाला तर…

 

सुंदर जन्म मानवाचा

संवेदना अन् बुध्दीचा

त्या सर्वेश्वराला स्मर

कधी वेळ मिळाला तर…..!!

 

~~~~•••••~~~~~•••••~~

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा