*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांनो…रक्त सांडू नका..!!*
अठरावे…!!
शब्दांनो राज्य गेले
पदरी वनवास आला
लाचार होऊनं आता
मला हिणवू नका…
शब्दांनो कळते जगाला
लेखनाची भूक माझी
कमरेभोवती उरली लंगोटी
हिरावून घेऊ नका…
होते नव्हते ते
शब्दांनो लुटले गेले
जगण्याचा आधार माझा
हिसकावून घेऊ नका..
संस्कृती आधार माझा
सूड उगवू नका
भूतकाळाशी वैर तुमचे
वर्तमान हिरावू नका..
शब्दांनो….
कळते जगाला भूक….माझी
या माझ्या बागेला
वणवा लावू नका.
जन्म बागेत गेला
शब्दांनो..माझे !रक्त सांडू नका..
शब्दांनो..जगणं माझ..
हिसकावून घेऊ नका..!!
बाबा ठाकूर धन्यवाद