You are currently viewing महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड ॲग्रीकल्चर असोसिएशनच्या लोकसंपर्क, प्रसारमाध्यमे आणि संवाद या समितीच्या उपाध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सेकर यांची निवड..

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड ॲग्रीकल्चर असोसिएशनच्या लोकसंपर्क, प्रसारमाध्यमे आणि संवाद या समितीच्या उपाध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सेकर यांची निवड..

सावंतवाडी:

‘मसिआ’ अर्थात ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड ॲग्रीकल्चर’ ही महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील सन १९२७ मध्ये उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली शिखर संस्था, २०२७ मध्ये मसिआ शतक महोत्सवी वर्ष साजरं करणार आहे. महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासात आणि रोजगार क्षेत्रात मसिआ विद्यमान कार्य कुशल अध्यक्ष मा. ललित गांधीं यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि आव्हाने याचा गांभीर्याने विचार करून भारत सरकारच्या कौशल्य विकास व लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंञालयाच्या सहकार्याने नवनवीन उद्योगांना चालना देवून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. मसिआचे हे कार्य प्रसार माध्यमांच्याद्वारे तळागाळापर्यंत पोचावे तसेच समाजातील सर्व घटक आणि मसिआ यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांची पब्लिक रिलेशन, मीडिया आणि कम्युनिकेशन या समितीच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झालेली आहे. नाशिक येथे संपन्न झालेल्या मसिआच्या राज्य कार्यसमीतीच्या सभेमध्ये ही घोषणा करण्यात आली.

ॲड. पार्सेकर हे गेल्या पस्तीस वर्षाहून जास्त काळ कोकणात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्याशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि ज्येष्ठ पत्रकार व मानव विकास संस्थानच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्या प्रेरणेने जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.

मसिआचे अध्यक्ष ललित गांधी, ज्येष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानावे, ट्रस्टी मंडळाचे चेअरमन आशीष पेडणेकर, कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब आणि मसिआच्या सर्वच सहकाऱ्यांनी दिलेल्या या नव्या जबाबदारी बद्दल श्री. पार्सेकर यानी आभार मानले असून या पदाला निश्चितच न्याय देण्याचे प्रतिपादन केले आहे. मसिआचे जिल्ह्यातील पदाधिकारी राजन नाईक, संतोष राणे, शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, विजय केनवडेकर यांच्या सहकार्याने मसिआचे कार्य तळागाळातील घटकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचे काम श्री. पार्सेकर यांच्याकडून प्रभावीपणे होईल असा विश्वास मसिआच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ॲड. पार्सेकर यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू, कुडाळ एम. आय. डी. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा