You are currently viewing कटुता…

कटुता…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कटुता…*

 

ताठरपणात नुसते

राहून चालते का..?

कटुता मनात निर्मम

राखून चालते का..?

 

नामात माझिया तो

वसतो प्रभाव, म्हणुनी…

वरचढपणाच अपुला

दावून चालते का..?

 

सद्भावना मनाशी,

राहो अशी निरंतर…

कटुतेत क्षुब्ध-कंपित

होवून चालते का..?

 

आयुष्य आपले ते

असते जरी स्वतःचे…

मर्जीत स्वैर नुसते

धावून चालते का..?

 

कटु भावना मनाशी

जगवी तमोगुणांना…

वर्तन पशूप्रमाणे

ठेवून चालते का..?

 

संयुक्तता कशी ती

देणार स्नेह माया…

ऋणानुबंध नाती

विसरून चालते का..?

 

मृत्यू यथार्थ अंतिम!

दावेल सरण जेंव्हा…

लागेल चार खांदे

विसरून चालते का..?

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा