शिवसेना युवासेना वैभववाडी तालुका आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.

*▪️शिवसेना युवासेना वैभववाडी तालुका आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…*

*▪️वैभववाडी दत्त मंदिर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी अभिषेक करण्यात आला.*

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना युवासेना वैभवाडी तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला.

सकाळी सर्वप्रथम वैभववाडी दत्त मंदिर येथे उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर शिवसेना युवासेना वैभववाडी तालुका आणि सिंधू रक्त प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात झाली यावेळी या शिबिराला उस्फूर्त्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून एक छत्री आणि कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांच्याकडून एक काजू कलम देऊन आभार मानण्यात आले.
सकाळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याप्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्यावेळाने शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी या शिबिराच्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख -संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक यांच्यासोबत तालुकाप्रमुख- मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस- स्वप्निल धुरी,उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे,उपजिल्हाप्रमुख- रज्जब रमदूल, जिल्हा कार्यकारी सदस्य -दिगंबर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर, शहर प्रमुख- शिवाजीराणेे, नगरसेवक- रणजीत तावडे, विभाग प्रमुख- जितेंद्र तळेकर , उपतालुका संघटक- बाबा मोरे, लक्ष्मण रावराणे ,अनिल नराम,विलास पावसकर,गणेश पवार, यशवंत गवाणकर्,संदेश सुतार,सुनिल रावराणे,आनंद नांदोस्कर,बबन धुरी,प्रवीण गायकवाड,राजेश पवार, भाई रावराणे ,सुरेश चाळके यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा