You are currently viewing डेगवे गावात झालेल्या नुकसानीची अर्चना घारेंकडून पाहणी…

डेगवे गावात झालेल्या नुकसानीची अर्चना घारेंकडून पाहणी…

डेगवे गावात झालेल्या नुकसानीची अर्चना घारेंकडून पाहणी…

बांदा

डेगवे गावात झालेल्या नुकसानीची आज शरद पवार, पक्षाच्या महिला नेत्या अर्चना घारे यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे डेगवे गावात अनेक घरांची पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर सौ. घारे यांनी आज त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष विवेक गवस, प्रसाद परब , बाळकृष्ण देसाई, महादेव परब , सलील देसाई , विजय देसाई , चंद्रकांत देसाई , सुनील देसाई , मंदार देसाई , साहिल देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा