कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्लेतील माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक धर्णे यांचा सन्मान..
वेंगुर्ले :
भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण म्हणजेच ” कारगिल विजय दिन ” होय . या दिनाचे औचित्य साधून भाजपा च्या वतीने ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक द्वारकानाथ धर्णे यांचा सत्कार करण्यात आला .३० वर्षे सेवा बजावलेल्या पुंडलिक धर्णे यांनी ऑपरेशन रक्षक , ऑपरेशन पराक्रम , ऑपरेशन विजय यामध्ये सहभागी झाले होते .
भारतीय सैन्यदलाप्रती गौरवशाली भावनांमध्ये भर घालणाऱ्या भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येक जवानाला मानवंदना आणि कारगिल युद्धात जिवाची बाजी लावलेल्या शुर विरांना नमन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो .
२५ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी २३००० फुट उंचीवर ६० दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात आजच्या दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केला . २ लाख भारतीय सैन्य कारगिल मध्ये होते. ५२७ जवान शहीद झाले , तर १४०० जवान जखमी झाले . ह्या दिवसाची आठवण म्हणून कारगिल दिन देशभर साजरा केला जातो .
हयावेळी मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक द्वारकानाथ धर्णे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मच्छिमार नेते दादा केळुसकर , महीला मोर्चा शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , रसिका मठकर , अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार , ब्राह्मण समाजाचे श्रीकांत रानडे उपस्थित होते .