You are currently viewing रंगसंगती

रंगसंगती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंगसंगती*

 

तीन रंगाची रंगसंगती, झेंडा आमुचा महान

देव ,देश आणि धर्मासाठी, गाऊ आम्ही गानं…!!धृ!!

 

श्वेत रंग हा शांततेचा, शोभून दिसतो किती

रंग केसरी त्यागाचा, नाही कशाची भीती

मधोमध ते चक्र शोभते, देशाची ती शान

देव ,देश आणि धर्मासाठी, गाऊ आम्ही गानं..!!१!!

 

रक्ताचे ते पाट वाहुनी, झाले कित्येक अजरामर

दाही दिशांनी लहरत आहे, झेंडा आमुचा अमर

देशासाठी प्राण अर्पिती, सैनिक घेउनी आण

देव ‘देश आणि धर्मासाठी,

गाऊ आम्ही गानं..!!२!!

 

सुजलाम सुफलाम देशाचा, रंग प्रतीक हिरवा

धुरंदर ही लेखणी आता, देशासाठी गिरवा

लेखकांनो जागे होऊनी, लेखणीला द्या मान..

देव, देश आणि धर्मासाठी, गाऊ आम्ही गानं..!!३!!

 

सौ सरिता परसोडकर पुसद ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा