देवगडात कांदळवन जनजागृतीपर कार्यक्रमाचे लवकरच आयोजन – प्राध्यापक नागेश दप्तरदार
आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन देवगड सह केळकर कॉलेज येथे साजरा..
देवगड
कांदळवन हे देशाला लाभलेले एक वैभव आहे. आतापर्यंत कांदळवन संदर्भात अनेक विविध उपक्रम करण्यात आले मात्र आता आगामी काळात कांदळवन संदर्भात देवगड मध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाईल्ड लाईफ वॉर्डन तथा वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी सांगितले देवगड येथे केले.
कांदळवन कक्ष मालवण कांदळवन प्रतिष्ठान मुंबई वन विभाग सावंतवाडी स ह केळकर कॉलेज देवगड आणि कांदळवन सह व्यवस्थापन समिती तारामुंबरी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै हा आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन देवगड केळकर कॉलेज येथील ग्रंथालय हॉल येथे साजरा करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक नागेश दप्तरदार, नेचर क्लबच्या प्रमुख प्राध्यापिका सुखदा जांभळे, प्राध्यापक मनोहर तेली, सागरी तज्ञ शाम चौगुले, कांदळवन समिती तारामुंबरीचे सदस्य लक्ष्मण तारी, वनरक्षक निलेश साठे, कांदळवन कक्षाचे प्रकल्प समन्वयक पूजा लुटे, राष्ट्रीय तसेच कृषी प्रकल्प समन्वयक दीपिका रावराणे , प्रियांका तारी आदी उपस्थित होते.
आतापर्यंत ४० हून अधिक देशात भ्रमंती केली त्या भ्रमंतीतून काही देशातील उदा.मॉरिशस सिशेल्स सारख्या देशांनी पर्यटनातून कशी समरूप प्रगती साध्य केली याचा मागोवा घेतला व आपल्या देशाचे कांदळवनाचे वैभव लाभले त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घेत कांदळवन पर्यटन क्षेत्रात उतरावे असे आवाहन सागरीतज्ञ श्याम चौगुले यांनी केले. तर विद्यार्थ्यांना या पुढील काळात आपल्या विद्यार्थी तसेच कांदळवनाचा अभ्यास करण्यास पुढे यावे. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग व कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रदेश अभ्यासासाठी शिष्यवृत्तीच्या लाभ घ्यावा आणि परदेशातील समृद्ध कांदळवनाचा अभ्यास करून त्याचे नवनवीन उपयोग व माहिती सादर करून विज्ञान तथा वैद्यकीय क्षेत्रात क्रांती करण्याचे आवाहन यावेळी कांदळवन समितीचे
तारामुंबरीचे सदस्य लक्ष्मण तारी यांनी केले. यावेळी प्रा. सुखदा जांभळे यांनी देखील कांदळवनचे महत्व काय आहे ? आणि त्याच्या विद्यार्थी वर्गाने कसा प्रकाशज्योत केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थी वर्गाला नेचर क्लबचे मेंबर बना व या पर्यावरण पूरक चळवळीत भाग घेऊन त्याच्या व्यापक अभ्यास करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक पूजा लुटे यांनी केले.यावेळी केळकर कॉलेजचा विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.