*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अवेळी*
अशा अवेळी
वाजवू नको पाऊल
देते हूल
सांज….
अशा अवेळी
कान्हा नको बासरी
राधा सत्वरी
बेभान….
अशा अवेळी
माळू नको मोगरा
भलत्या प्रहरा
जाग….
अशा अवेळी
मेघ आले दाटून
ओघळे पापणीतून
आसवे….
अशा अवेळी
अवचित आली सर
थेंबाचा बहर
ओलेता…..
अशा अवेळी
भेटावा तू आठवात
गावे स्वप्नात
तुझ्यासवे….
अशा अवेळी
भास आभासाचे रंग
होऊन दंग
न्याहाळते….
अशा अवेळी
मनात दाटते हूरहूर
माजते काहूर
अंतरात……..।।
अशा अवेळी
समीप तू असावा
आश्वासक हवा
स्पर्श…..।।
~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार@✍️