You are currently viewing विठू पांडुरंग…

विठू पांडुरंग…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विठू पांडुरंग…*

 

आषाढाच्या मासी

आली एकादशी ।

जनमानसाशी

हर्षोल्हास ।।

 

पंढरीची वारी

करे वारकरी ।

रामकृष्ण हरी

जयघोष ।।

 

कष्टकरी आम्हां

विठू मायबाप ।

देतो पाठी थाप

वात्सल्याची ।।

 

विठूराया कैसा

माय कनवाळू ।

बाप नारायणु

पाठीराखा ।।

 

घनश्याम ऐसा

विठू मेघराया ।

भिजवितो काया

वसुधेची ।।

 

रिमझिम वर्षा

सरिता भरात ।

रानं ते हरित

जाहलेया ।।

 

राजा पंढरीचा

कृपावंत साई ।

वसे ठाई ठाई

पांडुरंग ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा