You are currently viewing कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या जागेवर शिवसेनेचा दावा…

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या जागेवर शिवसेनेचा दावा…

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या जागेवर शिवसेनेचा दावा…

मालवण मधील आढावा बैठकीत आम. रवींद्र फाटक यांनी स्पष्ट केली भूमिका..

मालवण

मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये या मतदार संघाची जागा ही शिवसेनेला मिळावी, या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही या मतदार संघात आढावा घेत असून त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आज मालवणात आढावा घेण्यात आला आहे. येत्या रविवारपर्यत मतदार संघाचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती शिंदे शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार रवींद्र फाटक यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेची आढावा बैठक मालवण येथील दैवज्ञ भवन येथे आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आम. फाटक हे बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ-मालवण विधानसभा निरीक्षक बाळा चिंदरकर, राजेंद्र फाटक, दीपक वेतकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, युवासेना जिल्हा अधिकारी ऋत्विक सामंत, युवतीसेना महिला जिल्हा अधिकारी सोनाली पाटकर, किसन मांजरेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर, महिला संघटक नीलम शिंदे, महिला तालुका संघटक आशा वळप्पी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आम.फाटक म्हणाले, कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक ही शिवसेनेला लढवायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मतदार संघाचा सर्व्हे करण्यासाठी आपण आलेलो आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. सध्या जागा वाटपाचा विषय वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने या मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार येत्या रविवार पर्यंत आढावा, माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. महायुतीच्या माध्यमातून ही जागा आम्हाला जिंकायची आहे यासाठीची तयारी केली जाणार आहे.
कुडाळ- मालवण मतदार संघाची जागा ही शिवसेनेची आहे. शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी असे आमचे म्हणणे आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यानुसार याबाबतचा अहवाल त्यांना सादर केला जाईल, असेही ते म्हणाले.

शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. याची कार्यवाही येत्या १० ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत आपला पक्ष पुढे असावा. मुख्यमंत्री राज्यात चांगले काम करत आहेत. अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत त्यामुळे या योजनांच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावेत हेच पक्षाचे धोरण आहे, असेही आम. फाटक यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पर्यटन विकासासाठी नेहमीच आग्रही राहत आहेत. किनारपट्टीवरील देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी जे जे अपेक्षित आहे त्याची कार्यवाही येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केली जाईल असेही आम. फाटक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा