होमगार्ड नोंदणीसाठी 10 ऑगस्ट पर्यत अर्ज सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 278 जागा भरण्याकरीता नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले आहे. यासाठी 10 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov in/mahaha/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.