You are currently viewing पोलीसांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा केल्याच्याआरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

पोलीसांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा केल्याच्याआरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

पोलीसांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा केल्याच्याआरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर फिर्यादी देवेंद्र विजय जाधव, आपल्या सहकार्यांसोबत दोषी चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याविरुध्द कारवाई करत असताना मारुती सुझुकी ए. स्टार कार नंबर एम. एच. ४३ ए.बी.-५३९८ ही थांबविली म्हणून यातील संशयीत ओंकार सुधाकर शेट्टी याने गाडीतून खाली उतरुन मोठमोठ्याने “तुम सिर्फ पैसे कमानेके लिये गाडी रोक देते हो अब हमारी गाडी रोक दी है तो सभी गाडी रोकतो और उनपे भी कारवाई करो” असे म्हणून सह कर्मचारी प्रज्ञेश वाणीवडेकर त्यांच्या अंगावर धावून येवू लागला.
त्यावेळी फिर्यादी देवेंद्र विजय जाधव, हे त्यांना समजावण्यासाठी पुढे आले असता आरोपी ओंकार सुधाकर शेट्टी याने फिर्यादी यांच्या उजव्या खांद्यावर महाराष्ट्र पोलीसचा बॅच असलेला लुक्स डाव्या हाताने धरुन उजव्या हाताने फिर्यादी यांच्या नाका-तोंडावर मारुन मोठमोठ्याने हिंदीतून शिवीगाळ केली. फिर्यादी यांना धाक दाखवून त्यांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्यामुळे त्यांचे विरुध्द कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आलेली होती.

प्रस्तुत कामी आरोपी यांच्या वतीने सन्माननीय ॲड. अशपाक शेख यांनी युक्तीवाद केला. सदर कामी एकूण सहा साक्षीदार यांची कसूसुन तपासणी करण्यात आली. परंतु साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती तसेच आरोपी याचा तथाकथित घटनास्थळी वावर नसल्याचा फायदा घेवून सरकारी पक्ष सदरची केस शाबीत करु न शकल्याने सर्व बाबींचा विचार करुन व आरोपी यांच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून ओरोस येथील मे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा