You are currently viewing काव्यपुष्प – ५५ वे

काव्यपुष्प – ५५ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

*काव्यपुष्प – ५५ वे*

—————————————

श्री सद्गुरू कृपा असो सदा । निवाराव्या हो सकल विपदा

। लाभो समाधान सदा । विनवणी ही गजानन चरणी ।। १।।

 

स्वामी प्रेरणा । झाली माझ्या मना । लाभला प्रकाश मना ।

गती मिळे या लेखना ।। २ ।।

 

दशम अध्याया आरंभी । कथा आत्माराम भिकाजीची प्रारंभी..

 

भक्तांच्या भेटीला । स्वामी गेले उमरावतीला । आत्माराम भिकाजीकडे मुक्काम केला । श्री गजाननानी ।। ३ ।।

 

हा आत्माराम भिकाजी होता जरी । मोठा प्रांत अधिकारी ।

सदभाव सदा अंतरी । या गृहस्थाच्या ।। ४ ।।

 

समर्थ यांजकडे आले । त्याने यथासांग पूजिले । नाना नेवैद्य अर्पण केले । समर्थांना ।। ५ ।।

 

लोक उमरावतीचे । दर्शना आले साचे । आले विचार मना त्यांचे । न्यावे आपुल्या घरी समर्था ।। ६ ।।

 

साधू-संत अंतर्ज्ञानी । जाणती भक्तांच्या जे मनी। ते नेमके

ओळखूनी । आपणच जाती भक्तांसी भेटण्या ।। ७ ।।

******

क्रमशः करी लेखन कवी अरुणदास ।।

————————————–

कवी – अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा