You are currently viewing थोडं मनातलं

थोडं मनातलं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडं मनातलं*

*******************

माणसाचं मन इतकं संवेदनशील असतं ना की कोणी काहीही बोललं तरी त्याचा थेट मनावर परिणाम होतो.मन गहिवरून येते त्याच्या वेदनांचा भाव चेहेऱ्यावर दिसून येतो.म्हणजे मन किती हळवे असते बघा.कोणी बोललं,रागावल,चिडलं तर मनावर ओरखडे पडतात,मन जखमी होते.अशावेळी या जखमी मनावरच्या वेदनांना एक हळवी फुंकर हवी असते.असे घाव रोज कोणी ना कोणीतरी देत असतो कुणाकडूनतरी मिळत असतात.घरात,बाहेर, ऑफिसात,प्रवासात,आपले जवळचे संबंधित कोणीही छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलणी खावी लागतात.काम करूनही अशा उर्मट त्रासांना सामोरं जावं लागतं.मग अशावेळी प्रश्न पडतो की माणसाने कसं वागावं चांगलं रहावं की नाही काही कळत नाही.काहीजण सहन करून घेतात तर काही लगेचच उत्तराला उत्तर देऊन बोलणाऱ्याला त्याची जागा दाखवतात.त्यामुळे जे फटकळ असतात ऐकून न घेणारे असतात अशांना कोणी बोलतं नाही,रागवत नाही जे लगेचच बोलून मोकळे होतात अशांना घाबरून राहतात आणि त्याचा त्रास मग न बोलणाऱ्यांना सहन करावा लागतो.खर तर कोणी बरं वाईट बोललेल सहन करुन‌ घेण्या इतकी सहनशीलता किंवा मानसिकत आज तरी कोणात दिसत नाही.ऐकून घेण्या ईतके आज्ञाधारक आजच्या काळात फार कमी आहेत.किंवा एखाद्याच्या काहितरी व्यक्तीगत अडचणी असतात म्हणून संबंधित व्यक्तीला एकूण घ्यावं लागतं.पण काम करून ही बिनकामाचा कोणी बोलत असेल तर आजमितीला कोणी ऐकून घेत नाही. आणि का म्हणून ऐकून घ्यावं उगाचच. चुकत असेल तर ऐकून घ्यायला हरकत नाही.पण एखाद्याला उगाच टार्गेट करून त्याला छळण हे योग्य वाटत नाही.म्हणून माणसाने माणसांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन वागलं पाहीजे,शिवाय जशास तसे राहून वागायला हवे. कसं आहे की चित्रपटातच खलनायक असतात किंवा सिरीयल मध्येच शकुनी असतात असं नाही.तर खरोखरच आपल्या

अवतीभोवतीच असे काही खलनायक, शकुनी असतात की ते आपल्याला कळत नाही.अशी खलनायकी माणसं ईतके चांगले वागतात इतके गोंड बोलतात की त्यांच्या अशा बोलघेवडेपणाची जराही शंकाच येत नाही.पण अशी वरवर चांगली दिसणारी,वागणारी माणसं केंव्हा केसांने गळा कापतात यांचा जराही अंदाज येत नाही.म्हणजे पोटतिडकीने काळजी घेण्याचा देखावा दाखवणारी अशी माणसं आतल्या गाठीची असतात.पण प्रत्येकाला खलनायक होता येतं नाही.प्रत्येक माणूस हा आतल्या गाठीचा नसतो.प्रत्येकजण फसवा नसतो.प्रत्येकाला उगाचच त्रास देणं जमत नाही.लाळघोळेपणा तर प्रत्येकालाच जमतो असंही नाही.प्रत्येक माणूस समजदार समजूतदार समंजस नसतो.आणि प्रत्येकाचा शकुनी स्वभावही नसतो.खरोखरच काही माणसं सर्वांना आपलं समजून वागत असतात सोबत राहून काम करत असतात.प्रत्येकवेळी मदतीला त्यांचा पुढाकार असतो.मनात कोणतीही शंका न ठेवता ते समोरच्याशी चांगल्या मनाने माणूसकी या नात्याने त्यांच्याशी वागतात.पण जे खलनायकी धाटणीचे माणसं असतात अशांना चांगला माणूस कळत नाही. एखाद्याशी चांगलं न वागणं हा त्यांचा स्वभाव असतो.पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की.अशी खलनायकी, शकुनी,वृत्तीची माणसं जास्त काळ टिकत नाही.कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीशी तुम्ही जर चुकीचं वागत असालत तर इतर दहा माणसं तुमच्या वागण्याला बघत असतात आणि तुमचं चुकीची वागणं त्यांना कळाल्यावर ते नकळतपणे तुमच्या पासून दुर होतात.अशा वेळी वाईट वागणारा माणूस एकटा पडतो.आणि जेव्हा खऱ्याअर्थाने त्याला मदतीची गरज असते त्यावेळी त्यांच्या सोबत कोणीच नसतो.तेव्हा खलनायकाचा पराभव निश्चित असतो.पण एखाद्याशी चूकीचे वागून, बोलून,रागावून,उगाच त्रास देऊन त्यांचा छळ करून.स्वतःच स्वत:चा, स्वतःहून पराभव करून घेण्यात कोणता मोठेपणा आहे.तेव्हा आपणच आपणहून एखाद्याला आपलसं करून घेण्याचं खरा मोठेपणा आहे.तेव्हाच तो सर्वांच्या नजरेत माणूस म्हणून लायक समजला जातो काय…..

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा