You are currently viewing वर्षाऋतू

वर्षाऋतू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वर्षाऋतू*

 

नभोमंडपी पाऊस दाटे

आसमंती पसरे मृद् गंध

वारा असा उधाणलेला

मनमनात भरे सुगंध …१

 

कडकडाट बघुनी चपलेचा

चुके ठोका काळजाचा

करी वर्षाव उत्कट प्रेमे

अधीर अशा त्या मीलनाचा….२

 

सृष्टी भिजली जलधारांनी

झाले चराचर ओलेचिंब

पानापानातुनी ओघळती

जणू मोत्यांचे थेंब थेंब….३

 

क्षणार्धात बदलते सृष्टी

वसुंधरा तिची आवर्तने

तरू वल्लरी भिजताना

मोरांची थुईथुई नर्तने….४

 

अवखळ मन होई धुंद‌

अमृतधारांचा शिडकावा

माहेरच्या आठवणींचा

मनी वाजतो सुरेल पावा…५

 

©️®️ डॉ मानसी पाटील

 

प्रतिक्रिया व्यक्त करा