You are currently viewing आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोशन हळदणकर प्रथम…

आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोशन हळदणकर प्रथम…

आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोशन हळदणकर प्रथम…

ओमकार देसाई द्वितीय, संस्कार शिरोडकर तृतीय; बांदा रोटरॅक्टचे आयोजन…

बांदा

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या वतीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोशन हळदणकर प्रथम, ओमकार देसाई द्वितीय तर संस्कार शिरोडकर याने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, सहशिक्षक जे. डी. पाटील, रोटरॅक्टचे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, सचिव मिताली सावंत आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोटरॅक्टच्या विनिता कुबडे, ईश्वरी कल्याणकर, रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, ओमकार पावसकर, संकेत वेंगुर्लेकर यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा