You are currently viewing शिवापूर ग्रामपंचायत चा अंदाधुंद कारभार…

शिवापूर ग्रामपंचायत चा अंदाधुंद कारभार…

*शिवापूर ग्रामपंचायत चा अंदाधुंद कारभार…

गटाराचे काम पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा – विद्यमान सदस्य संदीप कदम

कुडाळ:
१४ वा वित्त आयोग निधीत कदमवाडी शिवापूर पायवाट व गटार बांधणे या कामाची मंजुरी घेण्यात आली. यामध्ये संपूर्ण पायवाट ९० मीटर त्यामधिल ३० मीटर गटार अंडरग्राउंड व त्यातील १५ मीटर ला कडप्पा लावणे असे संबंधित काम बंद गटार अशा स्वरूपाचे असून सद्यस्थितीत पाहता गटार की पायवाट हा प्रश्न उद्भवतो. ज्या ठिकाणी गटार अपेक्षित आहे त्या ठिकाणी पायवाट केली आहे व कडप्पा ही लावले नाहीत.  परिणामी यामुळे वाडीतील श्री.तुकाराम कदम,श्री.भागोजी कदम,श्री.यशवंत कदम,श्री.वामन कदम या चार व्यक्तींच्या घरांच्या भिंतींना धोका उद्भवतो.  यातील काही घरे पक्की नसल्याने मातीची आहेत यांचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण? ठेकेदार की ग्रामपंचायत हाही प्रश्न उद्भवतो.

या सर्व प्रकरणावर विद्यमान सदस्य संदीप कदम यांनी आक्षेप घेतला आहे.कामाचे स्वरूप पायवाट व बंद गटार असे आहे याच्यावर कडप्पा वगैरे काही न लावता पंचायत समिती सीईओ नी याला मंजुरी देऊन हे काम पूर्ण झाले आहे असेही नमूद केले आहे. संबंधित ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात काम करत असून काही ठराविक व्यक्तींना विश्वासात घेऊन कामे दिली जातात.  तसेच या कामासंदर्भात विद्यमान सदस्य संदीप कदम यांना विश्वासात न घेता सरपंच व ग्रामसेवक या संबंधित व्यक्तींना वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केलं गेलं.  म्हणजे कुंपणच शेत खाते की काय अशा पद्धतीच्या गोष्टी या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामांच्या बाबतीत सतत घडत असताना दिसून येतात.

सदरील काम ठेकेदार राधास्वामी कंट्रक्शन च्या माध्यमातून सुभाष रामचंद्र सावंत यांनी ग्रामपंचायत सरपंच सुनीता सुरेश शेगडे तसेच ग्रामसेवक संदीप सावंत यांना विश्वासात घेऊन हे काम घेतले असून या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत आहे परंतु विद्यमान सदस्य संदीप कदम यांचा आवाज दाबला जातो हेही तितकच खरं आहे संबंधित कामाची पूर्तता न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा