*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याची सुरावट….*
आयुष्याची सुरावट, आहे गोड , कडवट
वाटतसे आहे गोड पण लागते तिखट…
आयुष्याची सुरावट…
वाटतसे गावे गाणे, कधी घालावे उखाणे
काढू नये कुणाचेही माप आणि उणेदुणे
सर्व सुखी व्हावे वाटे नको काही कटकट
आयुष्याची सुरावट …
जरी वाटते हो मनी पण ऐकेनाच कोणी
जो तो करतो बघा ना आपापली मनमानी
जरा समजून घ्यावे करू नये वटवट
आयुष्याची सुरावट..
आयुष्याची सुरावट खूप करूण नि दु:खी
सुखासाठी भांडूनही कोणी होत नाही सुखी
षड् रिपू जंजाळात सारीकडे जळमटं
आयुष्याची सरावट ….
वाटे वाजावी बांसरी सुरेल ती सुरावट
जीव ओतून “राग” तो यावा एक अनवट
आनंदाच्या झुल्यावर प्यावे अमृताचे घट..
आयुष्याची सुरावट….
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)