*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रिमझिम पाऊस*🌹
नभ अंधारून आलं
काळ्या घनांची दाटी
सरीवरी येती सरी
धरतीच्या भेटीसाठी
रिमझिम पाऊस बरसला
मृदुगंध तो दरवळला
हिरव्यागार पानावरती
थेंब टपोरा ठिपकला
रातराणी सुगंधली
धवल मोगरा फुलफुलला
तरुतळी सुंदर गालिचा
कोणी आणुनी पसरवीला
काट्यावरचा गुलाब तो
ऐटीत झाडावर डुलतो
चंदन गंधीत स्पर्शातुनी
पिवळा पक्षी हळु उडतो
बांधावरच्या कुपाटीवर
वेल वेली पहुडल्या
झाडावरती खोप्यामध्ये
चिऊताई विसावल्या
निल आभाळी बलाकमाला.
स्वछंद होवुनी उडती
गोफ विणला इंद्रधनुचा
रंग रंगानी भिरभिरती
*शीला पाटील. चांदवड.*